
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंगळवारी मोठी उलथापालथ झाली. शनिवारी स्थापन झालेले सरकार अवघ्या 80 तासात कोसळले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करून हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय आहे असे म्हटले. तसेच त्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यावरही निशाना साधला.
अजित पवारांच्या राजीनाम्याची भविष्यवाणी ‘या’ भाजप नेत्याने कालच केली होती
शनिवारी भाजपने राष्ट्रावादीतून बंड करून आलेल्या अजित पवार आणि काही आमदारांना हाताशी घेऊन सरकार स्थापन केले होते. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यांनी नितिन गडकरी यांनी क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकते असे विधान केले होते. आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर नवाब मलिक यांनी गडकरींच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
https://www.saamana.com/maharashtra-political-crisis-live-update-ajit-pawar-devendra-fadnavis/
नवाब मलिक ट्विटरवर म्हणतात की, ‘नितिन गडकरी म्हणाले होते की क्रिकेट आणि राजकारणामध्ये कधीही, काहीही होऊ शकते, परंतु ते विसरून गेले की शरद पवार हे आयसीसीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी भाजप आणि फडणवीस यांना क्लिन बोल्ड केले आहे.’
बीजेपी नेता @nitin_gadkari जी
कह रहे थे की क्रिकेट और राजनीति
में कभी भी और कुछ भी हो सकता है ,
शायद वे भूलगए थे @PawarSpeaks ICC के अध्यक्ष रह चुके हैं ,
कर दियाना क्लीन बोल्ड ।#MaharashtraPolitics#MaharashtraGovtFormation— Nawab Malik (@nawabmalikncp) November 26, 2019




























































