अनिल गोटे यांचा स्ट्राँग रूमबाहेर रात्रभर मुक्काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएमबाबत प्रचंड संशय व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर धुळ्याचे आमदार आणि अपक्ष आमदार अनिल गोटे यांनी बुधवारची संपूर्ण रात्र चक्क स्ट्राँग रूमच्या बाहेर खडा पहारा दिला. त्यांनी अक्षरशः रात्र जागून काढली. स्ट्राँग रूमसमोरील परिसरात त्यांनी खाट टाकली होती. त्यांच्याबरोबर त्याच्या कार्यकर्त्यांनीही रात्र जागवली. विधानसभा निवडणुकीत गोटे यांचा विजय झाला.