प्रतिष्ठेच्या जनाग्रह पुरस्काराचा महाराष्ट्र मानकरी, पाच पैकी चार विभागांत पटकावले उपविजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोत्तम राज्य, सर्वोत्तम नागरी उपक्रम, सर्वेत्तम राज्य निवडणूक आयोग आणि सर्वेत्तम राज्य वित्त आयोग या चार विभागांत पारितोषिक पटकावत प्रतिष्ठेच्या जनाग्रह पुरस्काराचा महाराष्ट्र मानकरी ठरला आहे.

प्रशासनाला प्रभावी व अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसाठी जनाग्रह पुरस्कार देण्यात येतो. विकेंद्रीकरण चळवळीचे अध्वर्यू व्ही. रामचंद्रन यांच्या स्मृतिप्रीत्यथ देण्यात येणाऱ्य़ा जनाग्रह शहर प्रशासन पारितोषिकांच्या पाचपैकी चार विभागांत महाराष्ट्राने उपविजेतेपद पटकावले. 12 जानेवारी रोजी झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहारमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

या कामांसाठी पारितोषिक

नगरविकास : आराखडा मंजुरीचे विकेंद्रीकण, नवी मुंबई महापालिका : एकीकृत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली, राज्य निवडणूक आयोग : मतदारयादीचे विभाजन आणि डिजिटायझेशन, वित्त आयोग : शहरी स्थानिक संस्थांची स्वायत्तता मजबुती .