
मुंबई उपनगरचा कुस्ती संघ ‘महाराष्ट्र केसरी’ या मानाच्या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. सचिन यमगर हा गादी विभागातून तर राजेंद्र राजमाने हा माती विभागातून महाराष्ट्र केसरी गटासाठी लढणार आहे. मुंबई उपनगरचे 20 कुस्तीपटू या स्पर्धेत खेळणार आहेत. पुण्यात 2 ते 7 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे.
मानव सेवा संघाचे अध्यक्ष विनायक शिंदे यांच्या सहकार्याने मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघाची चाचणी पार पडली. ही निवड चाचणी स्पर्धा अध्यक्ष संपत साळुंखे, उपाध्यक्ष दगडू पार्टे, किसन मदने, सरचिटणीस विनायक गाढवे, खजिनदार सतीश कदम, चिटणीस सचिन वरखडे, तानाजी राजगे, नंदू मांढरे, महादेव ढमाळ, जगदीश गायकवाड, दिलीप सरक, राजू पोळ, गिरीश गाढवे, सुरेश जगदाळे, सुरेंद्र मोरे यांच्या उपस्थितीत पार पडली.
निवड झालेले कुस्तीपटू ः 55 किलो – अभिजित सावंत (गादी), शुभम मोरे (माती), 61 किलो – सौरभ हगवणे (गादी), अभिजित फणसे (माती), 65 किलो – शुभम ढमाळ (गादी), शुभम हगवणे (माती), 70 किलो – अविष्कार साबळे (गादी), आकाश पवार (माती), 74 किलो – सुमित मर्गजे (गादी), महेश पवार (माती), 79 किलो – सुमित डबिरे (गादी), शुभम वरखडे (माती), 81 किलो – गोविंद दिडवाघ (गादी), राम धायगुडे (माती), 92 किलो – नाना खांडेकर (गादी), गणेश तांबे (माती), 97 किलो – अक्षय गरुड (गादी), सतपाल सोनटक्के (माती), महाराष्ट्र केसरी गटासाठी – सचिन यमगर, राजेंद्र राजमाने, कोच – नंदकुमार मांढरे, जगदीश गायकवाड, टीम मॅनेजर – दिलीप सरक, मुकुंद कांचन.

























































