विधान परिषद निवडणुकीमध्ये बीडच्या ओबीसी समाजाचा नेत्या तथा भाजपच्या पदाधिकारी पंकजा मुंडे यांना डावलल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. गुरूवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास भाजपच्या गुरुगोविंद सिंगपुरा भागातील विभागीय कार्यालयावर मुंडे समर्थकांनी हल्ला चढविला. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच आवरल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी चौघांना वेदांतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली नाही. पंकजा मुंडे यांचे नाव गेल्या काही दिवसापासून विधान परिषदेसाठी चर्चेत होते. ‘संधी सोने करेन’ आणि ‘मला विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी, ही लोकांची इच्छा आहे’ असे म्हणत त्यांनी सूचक विधान केले होते. मात्र ऐन वेळेस मुंडे यांचा पत्ता कट करून इतरांना संधी देण्यात आली.
भाजपच्या या निर्णयामुळे मुंडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांनी टोकाची भूमिका घेऊन आपली नाराजगी व्यक्त केली आहे. मुंडे समर्थकांनी भाजपच्या विभागीय कार्यालयावर हल्ला चवण्याचा प्रयत्न केला. यावेळी केंद्रातील भाजप सरकार व नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपनं गाजर दाखवलं, पंकजा मुंडेंवर अन्याय; NCP कडून उमेदवारी मिळताच खडसेंचा हल्लाबोल
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी भाजप कार्यालयावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंडे समर्थकांना ताब्यात घेतले आहे. हल्ला करण्यासाठी आलेले कार्यकर्ते कोण होते? ते पंकजा मुंडे समर्थक आहे की नाही? याबाबत पोलीस तपास करत आहे.
View this post on Instagram

























































