‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलली

432

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार होती, पण त्या दिवशी ‘नीट’ परीक्षाही होणार असल्याने एमपीएससी पूर्वपरीक्षा रविवार 20 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेच्या सहसचिवांनी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

एमपीएससी पूर्वपरीक्षा आधी 5 एप्रिलला होणार होती. मात्र कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन 13 सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित झाले. तसे परिपत्रक 17 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले. मात्र 13 सप्टेंबरलाच नॅशनल एलिजिबिलिटी कम एण्ट्रन्स टेस्ट आयोजित करण्यात आली. नीट परीक्षेचे आयोजन एनटीए करते. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते. नीटमुळे एमपीएससी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या