
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद तसेच जयंत पाटलांच्या निलंबनप्रकारणी आता महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूर अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विरोधक दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. सरकारच्या निषेधार्थ विरोधी पक्षाचे आमदार दिवसभर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणार आहेत. हा निर्णय घेतल्या नंतर विरोधी पक्षातील आमदारांनी हातात फलक घेत सरकारचा निषेध केला.






























































