घाबरून गुजरातला पळणाऱ्या गद्दारांना महाराष्ट्रात भाव मिळणार नाही; आदित्य ठाकरे यांची गर्जना

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रुख आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना गद्दार मिंधे गटावर सडकून टीका केली. तुरुंगात टाकण्याच्या भीतीने जे गुजरातला पळून गेले अशा गद्दारांचे महाराष्ट्र ऐकणार नाही. महाराष्ट्रात गद्दारांना भाव मिळणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी निक्षून सांगितले. देशातील जनता इंडिया आघाडीसोबत आहे. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जनतेचा कौल मिळत आहे. त्यामुळे आमची शक्ती चार जूनला दिसेल. शिंदेंची शिवसेना नाही, त्यांचा गद्दार गट आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी मिंध्यांना फटकावले.

आम्ही शिवसेनेच्या मशाल गीतातून जय भवानी, जय शिवाजी काढणार नाही. ते आमचे ब्रीदवाक्य आहे. ते आम्ही अभिमानाने म्हणणार आहोत. निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा आहे. जय भवानी हे शब्द काढायला लावत ते महाराष्ट्राच अपमान करत आहे. यातून त्यांचा महाराष्ट्रद्वेष दिसून येतो, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच आमच्यावर कारवाई करण्याआधी निवडणूक आयोगाने भाजपवर कारवाई केली पाहिजे. भाजपवर कारवाई करण्याची हिंमत निवडणूक आयोगाने दाखवावी, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

…त्यांच्यासारखा निर्लज्ज व्यक्ती मी अजूनही पाहिला नाही. ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्या पाठित खंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करुन सगळे उद्योग गुजरातला पळवले. ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं. ज्यांनी तुम्हाला मंत्रिपद दिली, त्यांच्या कठीण काळात खंजीर खूपसन आणि अशी वक्तव्य करणे यांच्यासारखी मी निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही, असा निशाणाही आदित्य ठाकरे यांनी साधला.