विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी बोलावण्यात आले आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल तर सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल. रविवारी 11 वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होईल. त्यानंतर अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मतास टाकण्यात येईल. चव्हाण समितीने सुचवलेल्या पद्धतीने विधान परिषदेत जशी सभापतींची निवड होते त्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांची निवड होईल.



























































