आनंदवार्ता! पोलीस भरतीला सुरुवात; राज्यभरात 15,300 पदे भरणार, अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

मुंबईसह राज्यभरात बेरोजगार असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलांमध्ये एकूण 15 हजार 300 पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची अखेरची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. या भरतीअंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई (एसआरपीएफ), पोलीस बॅन्डस्मन, कारागृह शिपाई ही पदे भरली जाणार आहेत. 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान 18 ते 28 वर्षे असायला हवे. अर्ज भरताना खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला 450 रुपये, तर मागास प्रवर्गातील उमेदवाराला 350 रुपये फी भरावी लागेल. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती policerecruitment2025.mahait.org या अधिपृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

पदांचे नाव                  पद संख्या

पोलीस शिपाई             12,624

पोलीस शिपाई-वाहन चालक            515

पोलीस शिपाई (एसआरपीएफ)         1566

पोलीस बॅन्डस्मन         113

कारागृह शिपाई            554

पोलीस शिपाई एसआरपीएफ

पुणे एसआरपीएफ 1 (73), पुणे एसआरपीएफ 2 (120), नागपूर एसआरपीएफ 4 (52), दौंड एसआरपीएफ (104), धुळे एसआरपीएफ (71), गडचिरोली एसआरपीएफ (85), गोंदिया एसआरपीएफ (171), कोल्हापूर एसआरपीएफ (31), चंद्रपूर एसआरपीएफ (244), काटोल नागरपूर एसआरपीएफ (159), वरणगाव एसआरपीएफ (291).

कोणत्या शहरात किती जागा भरणार

मुंबई (2643), पुणे शहर (1968), ठाणे शहर (654), नागपूर शहर (725), पिंपरी-चिंचवड (322), मीरा-भाईंदर (921),  सोलापूर शहर (85), नवी मुंबई (527), लोहमार्ग मुंबई (743), ठाणे ग्रामीण (167), रायगड (97), रत्नागिरी (108), सिंधुदुर्ग (87), नाशिक ग्रामीण (380), धुळे (133), लोहमार्ग छ. संभाजीनगर (93), वाशिम (48), अहिल्यानगर (73), कोल्हापूर (88), पुणे ग्रामीण (72), लोहमार्ग नागपूर (18), सोलापूर (90), छ. संभाजीनगर ग्रामीण (57), छ. संभाजीनगर शहर (150), परभणी (97), हिंगोली (64), लातूर (46), नांदेड (199), अमरावती ग्रामीण (214), अकोला (161), बुलढाणा (162), यवतमाळ (161), नागपूर ग्रामीण (272), वर्धा (134), गडचिरोली (744), चंद्रपूर (215), भंडारा (59), गोंदिया (69), लोहमार्ग पुणे (54), पालघर (165), बीड (174), धाराशिव (148), जळगाव (171), जालना (156), सांगली (59).