अनलॉक 4 मध्ये ई-पास रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासही होणार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात नुकतेच अनलॉक 4 जाहीर झाले असून यात ई-पास रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवास सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील एक पत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे. पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजेच आरक्षण पद्धतीने 2 सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारपासून मध्य रेल्वेने प्रवासासाठी आरक्षण सुरू केले आहे. सध्या ज्या 200 विशेष गाड्या धावत आहेत त्याच गाड्यांमध्ये या नवीन नियमानुसार प्रवास करता येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

0f46aa68-cc64-4a8a-b9cb-13921cf34e9b