
विधानपरिषदेच्या कामकाजासाठी सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज तालिका सभापतींच्या नियुक्त्या जाहीर केल्या. शिवसेना आमदार सुनील शिंदे, भाजपचे अमित गोरखे, एकनाथ शिंदे गटाचे कृपाल तुमाने, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तालिका अध्यक्ष जाहीर
विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची नावे सभागृहात जाहीर केली. विधानसभा तालिका अध्यक्षपदी भाजपचे चैनसुख संचेती, समीर कुणावार, शिंदे गटाचे किशोर आप्पा पाटील, अजित पवार गटाच्या सरोज अहिरे, शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव जानकर, काँग्रेसचे रामदास मसराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासकीय विधेयके
सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक 2025 आणि सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 14 – मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2025 संमत झाले. दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली विधान परिषदेचे दिवंगत सदस्य श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ आणि प्रकाश केशवराव देवळे यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. सभापती शिंदे यांनी त्यासंदर्भात शोक प्रस्ताव मांडला.

























































