
महारेराने 20 वॉरंट्सपोटी मुंबई शहर व उपनगर, रायगड आणि ठाणे जिह्यांतील 11 विकासकांकडून 8 कोटी 57 लाख 26 हजार 846 रुपये एवढी रक्कम वसूल केली आहे. विशेष म्हणजे महारेराच्या पाठपुराव्यामुळे प्रत्यक्ष लिलावाशिवाय रक्कम वसूल झाली आहे.
महारेराने ग्राहकांना नुकसानभरपाईपोटी जारी केलेले वॉरंट्स वसूल व्हावे यासाठी महारेरा सातत्याने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संपर्कात आहे. महारेराच्या पाठपुराव्यामुळे अनेक ठिकाणी संबंधित विकासकांच्या मिळकती (प्रॉपर्टी) जप्त करून लिलावाच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. परिणामी आपली मिळकत जप्त होऊ नये यासाठी आता काही ठिकाणी विकासक पुढे येऊन या नुकसानभरपाईच्या रकमा भरत आहेत किंवा संबंधित ग्राहकांशी तडजोड करून नुकसानभरपाईचा प्रश्न निकाली काढत आहेत. ज्यांनी रकमा जमा केल्यात किंवा ग्राहकांशी तडजोडी केल्या, त्यात मुंबई उपनगरातील विधी रिअॅल्टर्स, स्कायस्टार बिडकॉन, लोहितका प्रॉपर्टीज, व्हिजन डेव्हलपर्स आणि विजयकमल प्रॉपर्टीज अशा पाच विकासकांचा समावेश असून त्यांनी एकूण 5 कोटी 39 लाख 87 हजार 137 एवढय़ा रकमेचे दावे निकाली काढलेले आहेत. यातील व्हिजन डेव्हलपर्सप्रकरणी उच्च न्यायालयात समेट झालेला आहे, तर विधी रिअॅल्टर्स आणि विजयकमल प्रॉपर्टीज यांनी ग्राहकांशी तडजोड करून तडजोडीच्या प्रतींची उपनिबंधकांच्या कार्यालयात रीतसर नोंदणी करून घेतलेली आहे.
- मुंबईतील मातोश्री प्रॉपर्टीज, श्री सद्गुरू डिलक्स आणि फलक डेव्हलपर्सनीही तीन वॉरंट्सचे एकूण 47,95,550 जमा केले आहेत, तर अलिबागमधील विनय अग्रवाल या विकासकाकडे 13 वॉरंट्सपोटी 1 कोटींच्या वर देणी आहेत. त्यापैकी त्यांनी न्यायाधिकरणाकडे 78,85 ,431 रुपये जमा केले आहे. ठाणे येथील रवी डेव्हलपर्स आणि नताशा डेव्हलपर्स या विकासकांनी अनुक्रमे 1 कोटी 19 लाख 58 हजार 728 आणि 71 लाख रुपये जमा केलेले आहेत.
आतापर्यंत 113 कोटींची वसुली
महारेराने आतापर्यंत 624.46 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईच्या वसुलीसाठी 1007 वॉरंट्स जारी केलेले आहेत. यापैकी आतापर्यंत 124 वॉरंट्सची 113.17 कोटींची रक्कम वसूल करण्यात महारेराला यश आलेले आहे. उर्वरित रक्कम वसूल व्हावी यासाठी महारेरा सातत्याने प्रयत्नशील