बाजार समिती निवडणूक; महाविकास आघाडीचा झेंडा फडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यभरात अनेक ठिकाणी आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. काही समित्यांचे निकाल हाती आले असून भाजप आणि शिंदे गटाला जोरदार धक्का देत महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे.

संजय राठोड यांना अस्मान

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय देशमुख आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांना बाजार समिती निवडणुकीत अस्मान दाखवले आहे. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीने  18 पैकी 14 जागी विजय मिळाला आहे.

तिवसा आघाडीकडे

माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासाठी प्रतिष्ठsची बनलेली तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीसाठी यशदायी ठरली असून सर्व 18 जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत.

पंकजा मुंडे यांना धक्का

बीड जिह्यातील वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आज हाती आला असून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास महाआघाडीचे 18 पैकी 18 सदस्य निवडून आले आहेत. या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागलाय.