उरण महावितरणचा कर्मचारी भ्रष्टाचारप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकुमार भगत, न्हावाशेवा
महावितरणच्या कर्मचाऱ्याला लाच मागितल्या प्रकरणी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. रविंद्र पाटील असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो उरण महावितरणच्या करंजा येथे कनिष्ठ अभियंतापदी कार्यरत होता. ग्राहकाकडून लाच मागितल्याचा त्याच्यावर आरोप होता. फोन रेकॉर्डिंगवरून एसीबीने त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एसीबीकडून उरण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी मार्च महिन्यात जसखार कनिष्ठ कार्यालयातील भरत ठाकूर आणि रवी राठोड या दोन कर्मचाऱ्यांना एसीबीने अटक केली होती. उरण तालुक्यात वीज खंडीत होण्याचे प्रमाण मोठे आहे. नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे अनेक तास वीज खंडीत होत असते त्यात तिळमात्र सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे उरण महावितरणच्या कार्यालयाला भ्रष्टाचाराची किड लागली असल्याचा नागरीकांचा आरोप आहे.