
शिवतीर्थावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची अतिविराट सभा पार पडली. या सभेसाठी मैदान खचाखच भरलेले होते. त्या सभेतील गर्दी पाहून धडकी भरलेल्या महायुतीच्य नेत्यांना आजच्या त्यांच्या शिवतीर्थावरील सभेसाठी परराज्यातूलन लोकं आणावी लागल्याचे समोर आले आहे. मुंबई तकने याबाबतचे वृत्त दिले असून त्यानुसार महायुतीच्या आजच्या सभेत मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमधून माणसं आली होती.































































