
संपत्तीच्या वादातून भावाने भावाची हत्या केल्याची घटना माहीम येथे घडली. सैफ सिरउद्दीन खान असे मृताचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी फजिल खानला माहीम पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सैफ हा माहीमच्या गायवाडी पटेल चाळीत राहत होता. त्या दोन्ही भावांचा संपत्तीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. शनिवारी फजिल हा सैफकडे आला होता. तेव्हा त्याने आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांची मागणी केली. संपत्तीच्या हिश्श्यावरून त्या दोघांत वाद झाला. तेव्हा सैफने कागदपत्रे आणि हिस्सा देण्यास विरोध केला. त्यानंतर फजिलने सैफला धक्काबुकी करून खाली पडले. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच माहीम पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी सैफच्या पत्नीचा जबाब नोंदवून घेत फजिलविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.




























































