
महिंद्रा उद्योग समूहाच्या 75व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आपली बहुप्रतीक्षित, एसयूव्ही ‘ऑल-न्यू थार’ आज बाजारात सादर केली. ‘एएक्स’ व ‘एलएक्स’ अशा दोन प्रकारांत ही कार मिळणार आहे. ‘एएक्स’ची प्रारंभिक किंमत 9.80 लाख रुपये आहे, तर ‘एलएक्स’ची प्रारंभिक किंमत 12.49 लाख रुपये आहे. 2.0 लिटर एमस्टॅलियन टीजीडीआय पेट्रोल इंजिन आणि 2.2 लिटर एमहॉक डिझेल इंजिन, 6 स्पीड स्वयंचलित किंवा मॅन्युअल ट्रान्समिशन, कन्व्हर्टिबल टॉप, 17.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, क्रूझ कंट्रोल अशी कारची वैशिष्ट्ये आहेत. कारच्या वितरणास येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. नजीकच्या डीलरशी संपर्क साधून किंवा महिंद्राच्या वेब साईटवरून कारची बुकिंग करता येईल. टेस्ट ड्राइव्ह देखील उपलब्ध होणार आहेत.






























































