
दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील टपाल पेटी कचऱ्याच्या विळख्यात सापडली आहे. कचऱ्यामुळे येथे दुर्गंधी पसरली असून नागरिकांना फुटपाथवरून जाताना नाकावर रूमाल धरून जावे लागत आहे. त्यामुळे टपाल पेटी भोवती असलेला कचरा लवकरात लवकर साफ करावा, अशी मागणी दादरकरांकडून जोर धरू लागली आहे.


























































