Photo – आमरस आणि मिसळ पार्टीत रंगलंय कुटुंब, सेटवर सुरू आहे धम्माल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू असताना, प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या मालिकांचं चित्रीकरण मात्र थांबलं नाही. प्रेक्षकांची आवडती मालिका ‘माझा होशील ना’चं शूटिंग सध्या सिल्व्हासामध्ये सुरू आहे. जवळपास एका महिन्याच्यावर हे सर्व कलाकार आपल्या कुटुंबापासून दूर राहून तिकडे चित्रीकरण करत आहेत. जरी कुटुंबापासून दूर असले तरी मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ कुटुंबाप्रमाणेच एकमेकांची काळजी घेत आहे आणि तितकीच धमाल देखील करत आहेत.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

नुकतंच या मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमने आमरस पार्टी केली. घरापासून दूर असल्यामुळे मनसोक्त आंबे खाण्याची संधी हुकली असं होऊ नये म्हणून सेटवरच या टीमने आमरसचा मनमुराद आस्वाद घेतला. सेटवर आमरसचा बेत असल्यामुळे सर्वांच्या तोंडाला पाणी तर सुटलंचं पण जिभेवरचा ताबा देखील सुटला आणि संपूर्ण टीमने काही मिनिटातच या आमरसचा फडशा पडला. या खास आमरस पार्टीची क्षणचित्रं या झी मराठीवरील मालिकेच्या चाहत्यांसाठी.

majha-hoshil-na-amaras majha-hoshil-na-party majha hoshil na party