जाणून घ्या मकर संक्रांतीचं वैशिष्ट्य

makar-sankranti

मकर संक्रांत हिंदू संस्कृतीतील एकमेव सण आहे जो दरवर्षी इंग्रजी कॅलंडरनुसार निश्चित तारखेला येतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीमधील, ‘मकर’ हा शब्द मकर राशीचे प्रतीक आहे व ‘संक्रांती’ म्हणजे संक्रमण. मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला ‘मकर संक्रांत’ म्हणतात.

मकर संक्रांत का साजरी करायची?

makar-lay-copy

संक्रांतीच्या आधीच्या येणाऱ्या दिवसाला भोगी असे म्हणतात. मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे तसेच शास्त्रीय महत्त्व देखील आहे. सूर्य दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेने येतो. हे भासमान भ्रमण मानले जाते. सूर्याची ही स्थिती अत्यंत शुभ आहे. धार्मिक दृष्टीकोनातून या दिवशी सूर्य आपला मुलगा शनिदेव याच्यावर असलेली नाराजी सोडून आपल्या घरी येतो.  म्हणूनच मकर संक्रांतीचा दिवस आनंद आणि समृद्धीने पूर्ण असतो.

तीळ आणि गूळ यांचे महत्त्व 

tilgul-2

मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू करण्याची पद्धत आहे. यामागे भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा असे म्हटले जाते. पण या गोष्टीलाही  वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. थंडीत शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची आवश्यकता असते. तसेच गुळातही उष्णता असल्याने या पदार्थांचे महत्त्व आहे. म्हणून मकर संक्रांतीला तिळगुळाचे लाडू एकमेकांना दिले जातात.

मकर संक्रांतीला पतंग का उडवतात?

makar-sankranti

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे. या दिवशी आकाशात रंगीत पतंग दिसतात. अनेक ठिकाणी पतंग उडवण्याच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. पण पतंग सकाळी उठून उडवल्याने शरीराला ऊन लागून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते.

मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण

sunrise-11

मकर संक्रांतीच्या वेळीच ऋतु मध्ये परिवर्तन होते. शरद ऋतुचा प्रभाव  कमी होऊन वसंत ऋतु सुरू होतो. या दिवसा आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्र लहान दिवस मोठा होत जातो. धार्मिक मान्यतेनुसार जी व्यक्ती मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर पवित्र नदीत स्नान करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. तसेच दान धर्म करून पुण्यप्राप्ती होतो.

आपली प्रतिक्रिया द्या