
देशविदेशातील पक्षीप्रेमींचे आणि पर्यटकांचे आकर्षण पर्यटन स्थळ असलेल्या पनवेलजवळील कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या 11 कोटी 65 लाख रुपयांच्या निसर्ग पर्यटन आराखडय़ास आज तत्त्वतः मान्यता देण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.
कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या विकासाच्या संदर्भात मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 26 जानेवारी 2021 पर्यंत या निसर्ग पर्यटन विकास आराखडय़ाचे काम पूर्ण करावे अशा सूचनाही वनमंत्र्यांनी यावेळी दिल्या. पक्षी अभयारण्यातील कर्नाळा किल्ला हा पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे. 12.1094 चौ.कि.मी क्षेत्राच्या अभयारण्यामध्ये पक्ष्यांच्या 147 प्रजाती आहेत.



























































