विकासकाला धमकी दिल्याप्रकरणी एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड येथील एका विकासकाला दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्या प्रकरणी एकाला बंगळुरू येथून अटक केली. सचिन श्रीनिवास कुदर ऊर्फ सचिन पुजारी त्याचे नाव आहे. दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावर सचिनला 20 टक्के रक्कम मिळणार होती अशी माहिती तपासात समोर आली आहे. गुन्ह्यात यापूर्वी दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली होती.

तक्रारदार हे विकासक असून त्याचे गोरेगाव आणि अंधेरी येथे इमारतीचे प्रोजेक्ट सुरू आहेत. अंधेरी येथील प्रोजेक्टचा वाद न्यायालयात गेल्याने तेथील काम सध्या बंद आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी तक्रारदार यांना एकाने संपर्क साधून मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र लॉकडाऊन काळात त्याचे संभाषण बंद झाले होते. त्याचदरम्यान त्यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमक्या येण्यास सुरुवात झाली. धमकीप्रकरणी तक्रारदार याने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक धनंजय लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विवेक तांबे, अशोक काsंडे, गिरी, शेख यांच्या पथकाने तपास सुरू केला.

तक्रारदार यांना ज्या नंबरवरून पह्न येत होते त्याची माहिती पोलिसांनी काढली. पह्न करणारा हा बंगळुरू येथे असल्याचे समजताच पोलीस तेथे गेले. तेथून पोलिसांनी महेश पुजारीला अटक केली. त्याच्या चौकशीत सचिन पुजारीचे नाव समोर आले. तो बंगळुरूला असल्याचे समजताच तांबे यांचे पथक गेले. पोलिसांनी तीन दिवस तेथे फिल्डिंग लावून अखेर सचिनला ताब्यात घेतले. महेशच्या सांगण्यावरून सचिनने धमकीचा पह्न केल्याचे तपासात समोर आले आहे.

महेशच्या अटकेनंतर सचिन पळून गेला. दोन वर्षांपूर्वी एक अटक आरोपी हा दक्षिण आफ्रिका येथे गेला होता. टांझानिया येथे गेल्यावर एकजण अटक आरोपीला भेटला. तेथे एकाने तक्रारदार यांची टीप दिली होती अशी माहिती समोर आली आहे. खंडणीच्या सचिनला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.