काव्य मराठी, विद्यार्थी मराठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड पश्चिम येथे प्रज्ञा प्रबोधन संस्थेच्या वतीने कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रबोधन विद्या निकेतन शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने कुसुमाग्रजांच्या पुस्तकांचे प्रदर्शन आणि काव्य पुष्पांजली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. शिवसेनेचे अशोक पटेल यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभदा नाईक, रोहिणी सावे, प्रवीणा वाडेकर, नीलम माने मेहनत घेत असून सूत्रसंचालनाची जबाबदारी हर्षदा राऊत सांभाळणार आहेत.