पाककृती : थंडगार मलई कुल्फी

228

साहित्य : 2 कप दूध, 1 कप क्रिम, १ कप कंडेन्स्ड मिल्क, १ टीस्पून वेलची पावडर, पाव कप मिक्स ड्रायफ्रूट, केसर

कृती : एका टोपात दूध तापवायला ठेवा. स्लो गॅसवर दूध उकळत ठेवा. त्यात क्रिम टाकून सतत ढवळत राहा. त्यानंतर कंडेन्स्ड मिल्क टाका व व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर केसर व वेलची पूड टाकून दूध घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाका. मिश्रण थंड झाले की मातीच्या मडक्यांमध्ये भरा. सात ते आठ तास फ्रिज करा. थंडगार मलई कुल्फी तयार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या