फारच बोल्ड आहे ‘मलंग’चे नवीन पोस्टर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिशा पाटणी व आदित्य रॉय कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित मलंग या चित्रपटाचे दुसरे पोस्टर शनिवारी रिलीज करण्यात आले आहे. हे पोस्टर अत्यंत बोल्ड असून त्यात आदित्य कपूर व दिशा एकमेकांना किस करत आहेत. या बोल्ड पोस्टरमुळे आता प्रेक्षकांना चित्रपटही जबरदस्त बोल्ड असणार याचा अंदाज आला आहे.

3 जानेवारीलाच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यात आदित्यचा जबरदस्त लूक पाहायला मिळाला होता. या पोस्टरमधील आदित्यचे सिक्स पॅक बघून चाहते खूष झाले आहेत. या पोस्टरसोबत आदित्यने ‘प्रेमासारखीच तिरस्कार, द्वेषही तितकाच पवित्र असतो. या चित्रपटात आदित्य व दिशासोबत अनिल कपूर, कुणाल खेमू देखील दिसणार आहेत. येत्या 6 जानेवारीला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 7 फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.