मालदीवमध्ये योग दिनी मुस्लिम कट्टरतावाद्यांचा हैदोस, पोलिसांचा लाठीचार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण आशियात असलेल्या मालदीव या देशात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी कट्टरतावाद्यांनी हैदोस घातल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर ही परिस्थिती नियंत्रणात आली.

आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मालदीवची राजधानी माले येथील गलोल्हू राष्ट्रीय स्टेडिअममध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात योग शिबीर होणार होतं. पण, मंगळवारी सकाळी जसा हा कार्यक्रम सुरू झाला, तसा तिथे मुस्लिम कट्टरतावाद्यांनी हल्ला केला. अल्लाहू अकबर अशा घोषणा देऊन त्यांनी योगासने करणाऱ्या लोकांना धमकावयला सुरुवात केली.

त्यामुळे योगासनं करायला आलेली माणसं घाबरली. तिथे एकच कल्लोळ उडाला. अखेर तिथे पोलिसांनी हजेरी लावली. त्यानंतर तिथे अश्रुधुरांची नळकांडी फोडण्यात आली. उपद्रवींना काबूत आणण्यासाठी अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केला.