अणुचाचणीचा वर्धापन दिन

हिंदुस्थानच्या पहिल्या अणुचाचणीच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला दाद दिली. तसेच प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याचे म्हटले. 1974 मध्ये आजच्याच दिवशी हिंदुस्थानने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली. या चाचणीसह हिंदुस्थानने अणुक्षमता असलेल्या राष्ट्रांच्या यादीत प्रवेश केला. 51 वर्षांपूर्वी हिंदुस्थानने पहिली अणुचाचणी केली होती आणि अशा चाचण्या करणारा तो जगातील सहावा देश बनला होता, असे खरगे यांनी ’एक्स’ पोस्टमध्ये म्हटले. तर इंदिरा गांधींच्या दूरदर्शी आणि निर्णायक नेतृत्वाखाली हिंदुस्थानने 51 वर्षांपूर्वी राजस्थानमधील पोखरण येथे ‘ऑपरेशन स्मायलिंग बुद्धा’ ही पहिली अणुचाचणी केली.