
मोदी सरकार गरिबांना श्रीमंतांचे गुलाम बनवू इच्छितात, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मनरेगा योजनेचे नाव बदलल्यावरून भाजपवर केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे. खरगे म्हणाले आहेत की, “मनरेगा ही गरीबांची जीवनवाहिनी आहे. ते (सरकार) गरीब लोकांना श्रीमंत लोकांचे गुलाम बनवू इच्छितात. मी याची निंदा करतो.”
निवडणूक आयोगाने घुसखोरांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी एसआयआर सुरू केला होता, परंतु देशद्रोही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, आज आसाम येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले आहेत. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “त्यांची सरकार केंद्रात आहे. जर ते सुरक्षा देण्यात अपयशी ठरत असतील तर ते आम्हाला कसे दोष देऊ शकतात? आम्ही (विपक्षी पक्ष) तेथे राज्य करत आहोत का? जर ते अपयशी ठरत असतील तर, ते प्रत्येक गोष्टीसाठी विपक्षाला दोष देतात.”
#WATCH कलबुर्गी, कर्नाटक: कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बयान पर कहा, “उनकी सरकार केंद्र में है… अगर वे सुरक्षा देने में फेल होते हैं तो वे हमें कैसे दोष दे सकते हैं। क्या हम (विपक्षी पार्टियां) वहां राज कर रहे हैं? अगर वे फेल… pic.twitter.com/4VTTnoQD6O
— ANI_HindiNews (@AHindinews) December 21, 2025





























































