गोळवण ग्रामपंचायतीवर‌ शिवसेनेचा भगवा फडकणार, आनंद चिरमुले यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

15 जानेवारीला होऊ घातलेल्या गोळवण ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास शिवसेना युवासेना पदाधिकारी आनंद चिरमुले यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार जनतेचे सरकार म्हणून काम करत आहे. त्याच धर्तीवर मालवण-कुडाळमध्ये आमदार वैभव नाईक हे काम करत आहेत. कोरोनाच्या भयंकर काळात आमदार स्वतःच्या जीवाची परवा न करता पायाला भिंगरी लावून मतदारसंघात जनसेवेसाठी फिरत होते. विरोधक मात्र दिखावागिरी करत आंदोलने करण्यात व्यस्त होते. त्यामुळे जनतेची काळजी कोणाला आहे हे सर्वांनाच माहिती आहे.

आमदार वैभव नाईक यांनी गोळवणमध्ये लाखो रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे गोळवणची वडीलधारी मंडळी, महिला वर्ग यांचा आशीर्वाद आणि तरूणाईच्या शुभेच्छा शिवसेनेच्या पाठीशी आहेत

त्यामुळे गोळवण ग्रामपंचायतीवर 15 वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मांडणारी जेष्ठ मंडळीही गोळवण गावात आहेत. त्यामुळे शिवसेनेचा विजय निश्चित आहे.

गोळवण-कुमामे-डिकवल मध्ये जी विकासकामे प्रलंबित राहिली आहेत. ती देखील आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मार्गी लावणार आहोत. असं आनंद चिरमुले यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.