मालवण मासेमारी जाळीत भलामोठा दुर्मिळ ‘जेलिफिश’ सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण समुद्र किनारपट्टीवर दांडी येथील रापण पद्धतीच्या मासेमारी जाळीत एक भलामोठा जेलिफिश सापडून आला आहे. मोठ्या आकाराच्या हा जेलिफिश मालवणसह प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर पहिल्यांदाच सापडून आल्याचे मच्छिमार व मत्स्य अभ्यासक यांनी सांगितले आहे.

दरम्यान या जेलिफिशचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मत्स्यकी संशोधन संस्था वर्सोवा मुंबईची टीम मालवण येथे येणार असल्याची माहिती स्थानिक मत्स्य अभ्यासक यांनी दिली आहे.

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात जेलिफिश मासेमारी जाळीत सापडून येत आहेत. त्याचा परिणाम मासळीवर झाला आहे. मासळीचे उत्पादन घटले आहे. परिणामी जी मासळी मिळत आहे त्याचे भाव वाढले आहेत.

ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये सापडतात

मोठ्या आकाराच्या या जेलिफिशची प्रजाती प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड लगतच्या पॅसिपीक महासागरात पाहायला मिळते. हिंदुस्थानात या प्रजातीची नोंद तशी दुर्मिळच असल्याचे मालवण येथील मत्स्य अभ्यासक यांनी माहिती देताना सांगितले.