
सामना प्रतिनिधी। मालवण
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना मालवण शहर शाखेत त्यांच्या अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली.
बाळासाहेबांच्या अर्धपुतळ्याची देवली चौके मार्गे मालवण बाजरपेठ अशी भव्य ढोलताशांच्या गजरात दुचाकी रॅली काढली. बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणांनी मालवण नगरी दुमदुमून गेली. तर गाड्यांना लावलेले भगवे झेंडे पाहता ‘भगवी लाट’ सर्वत्र दिसून आली. जेष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या उपस्थित काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत शेकडो शिवसैनिक, महिला सहभागी झाले होते.
तालुकाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या संकल्पनेतून या पुतळ्याची स्थापन करण्यात आली. देवली येथील मूर्तिकार कमलेश चव्हाण व कुटुंबीय यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अर्धपुतळा साकारला.
तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, आरोग्य सभापती पंकज सादये, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, अंजना सामंत, दीपा शिंदे, पस सदस्या मधुरा चोपडेकर, यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
भव्य दुचाकी रॅली आणि ढोलताशांच्या गजरात देवली, चौके मार्गे मालवण असा पुतळा जल्लोषपूर्ण वातावरणात आणण्यात आला. मालवण शहरात शिवसेना शाखा-भरड-बाजारपेठ-फोवकांडा पिंपळ ते शाखा अशी रॅली काढण्यात आली. त्यानंतर पुतळ्याचे तालुका कार्यलयात पूजन करून स्थापना करण्यात आली. यावेळी मूर्तिकार चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
‘गजर बाळासाहेबांचा’
शिवसेना शाखा येथे बुधवारी सायंकाळी महिलांसाठी पाककला (उकडीचे मोदक) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तर रात्रौ बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी ‘गजर बाळासाहेबांचा’ या विशेष संगीत भजन स्पर्धेचे आयोजन तालुकाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. दोन्ही स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
























































