
मालवणी येथे पोलिसांनी कारवाई करून तीन बालकामगारांची सुटका केली आहे. त्या तिन्ही मुलांची रवानगी बालगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
मालवणी येथील काही दुकानांत बालकामगार काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी मालवणी येथील वेल्डिंग आणि कबाबच्या दुकानात छापा टाकून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेली ती तिन्ही मुले चौदा ते पंधरा वयोगटातील असून ते मूळचे बिहार आणि आंध्र प्रदेशचे रहिवाशी आहेत. त्या तिघांना कामाचा कमी मोबदला दिला जात होता. पोलिसांनी त्या तिन्ही मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची रवानगी बालगृहात केली. तर अल्पवयीन मुलांना कामावर ठेवणाऱ्या दोघांविरोधात मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला.





























































