
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारी कोलकाता उच्च न्यायालयात एका महत्त्वाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी हजर झाल्या. यावेळी त्या वकिलाच्या काळ्या गाऊनमध्ये न्यायालयात पोहोचल्या होत्या. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारांच्या प्रकरणातील खटल्यात त्या स्वत: न्यायालयात युक्तीवाद करणार आहेत. तृणमूल काँग्रेसने याबाबत x वरून त्यांचा व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली आहे.
Our Hon’ble Chairperson Smt @MamataOfficial personally reached the Calcutta High Court today to argue in a matter concerning the widespread post-poll violence unleashed across Bengal by @BJP4Bengal.
Once again, she has shown what truly sets her apart –
She NEVER abandons the… pic.twitter.com/8OkszMxaYa
— All India Trinamool Congress (@AITCofficial) May 14, 2026
तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील कल्याण बॅनर्जी यांचे पुत्र शीर्षण्य बॅनर्जी यांनी ही याचिका दाखल केली आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव होऊन १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आणि भाजप सत्तेवर आला. या निकालानंतर राज्यातील राजकीय कार्यकर्ते आणि पक्षाच्या कार्यालयांवर हल्ले झाल्याचे आरोप करण्यात आले होते. याच प्रकरणाशी संबंधित सुनावणीसाठी ममता बॅनर्जी कोर्टात उपस्थित राहिल्या.
निवडणूक हिंसाचार प्रकरणी ममता बॅनर्जी स्वत: मैदानात, कोर्टात लढाई लढणार pic.twitter.com/V3FP737KlT
— Saamana Online (@SaamanaOnline) May 14, 2026




























































