जर बंगालमध्ये भाजप सत्तेवर आली तर मासे खाण्यावरही बंदी येईल, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज्यात भाजप सत्तेत आल्यास नागरिकांना नॉनव्हेज खाण्यावर बंधने येऊ शकतात. “मासे खाण्यावरही बंदी येईल आणि इतर नॉनव्हेज पदार्थांवरही निर्बंध लादले जातील,” असे त्या म्हणाल्या. याशिवाय, भाजप सत्तेत आल्यास राज्यातील महत्त्वाच्या कल्याणकारी योजना बंद केल्या जातील, असा आरोपही त्यांनी केला. विशेषतः ‘लक्ष्मी भंडार’ योजनेचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, ही योजना तसेच इतर अनेक योजना बंद करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.

ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निवडणुकीत आघाडी मिळवण्यासाठी विविध मार्गांचा वापर केल्याचा आरोप केला. “निवडणुकीपूर्वी SIR प्रक्रियेच्या माध्यमातून सुमारे 1.2 कोटी मतदारांची नावे यादीतून काढून टाकण्यात आली,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच भाजपकडून त्यांना आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही भाजप बंगालमध्ये पराभूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि “भाजपला पराभूत करण्यासाठी बंगालमधील जनतेने एकत्र यावे,” असे आवाहन केले.