
सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा
कर्ज फेडण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका मुलाने त्याच्या वृध्द आई वडिलांना बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत आई वडिल दोघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी वृद्ध पिता दत्तात्रय सदाशिव दहातोंडे वय ६० यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा शहरातील दत्तात्रय सदाशिव दहातोंडे यांना 2 मुले असून ते विभक्त राहतात. त्या पैकी संदीप दहातोंडे हा मुलगा दि.26 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास घरी आला व त्याने वडिलांक़डे पैशांची मागणी केली. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापाच्या भरात संदीपने वडिलांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. संदीपला रोखण्यासाठी पुढे आलेल्या त्याच्या आईला देखील त्याने बेदम मारहाण केली. तसेच पैसे दिले नाही तर तुम्हाला दोघांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याबाबत दत्तात्रय सदाशिव दहातोंडे यांनी मारहाण करणारा मुलगा संदीप दत्तात्रय दहातोंडे याच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हवालदार रेवणनाथ दहिफळे हे करत आहेत
























































