
बायको आणि आईच्या भांडणाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. उत्तर प्रदेशमधील ही घटना असून सचिन सैनी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात सचिन सैनी हे आपल्या पत्नी आणि आईसह राहत होते. पत्नी आणि आईमध्ये सातत्याने भांडणे होत होती. या भांडणाला सैनी खूप कंटाळलेले होते. सोमवारी सैनी यांच्या पत्नी आणि आईमध्ये पुन्हा भांडणे झाली. तेव्हा सैनी यांनी पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.



























































