मन धुंद झाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे, प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्याविना आपण जगूच शकत नाही अशी काहीशी प्रेमाची नवी व्याख्या सांगणारे ’मन धुंद झाले…’ हे नवं कोरं गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकनं या गाण्यानं लाँच झाल्यानंतर लगेच संगीतप्रेमींना खऱया अर्थानं धुंद केले आहे. सोशल मीडियावर हे गाणं रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याची निर्मिती एसडी प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली केली आहे. निलेश जगधने आणि राधिका पाटील या कलाकारांवर हे गाणं चित्रीत केलं आहे. निसर्गरम्य ठिकाणांवर चित्रीत केलेलं हे कर्णमधूर गाणं नेत्रसुखदही आहे. प्रेमाचा गुलाबी रंग उधळणाऱया या गाण्यात निलेश–राधिकाची केमिस्ट्री लक्ष वेधून घेणारी आहे.