
विजेचा बोर्ड पुसत असताना विजेचा धक्का लागून गव्हे येथील 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सचिन सुरेश लिंगावळे असे तरुणाचे नाव आहे.।रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गव्हे, पवारवाडी येथील सचिन लिंगावळे हे आज दुपारी 1.30 च्या सुमारास त्यांच्या पडवीत असलेला विजेचा बोर्ड पुसत होते. बोर्ड पुसत असताना अचानक विजेचा धक्का लागून ते बेशुद्ध पडले. सचिनचा आवाज ऐकून त्यांच्या वडिलांनी घरातील पडवीत धाव घेतली असता त्यांना सचिनच्या हातात विजेचा बोर्ड दिसला. काठीने तो बाजूला करून सचिनला प्रथमोपचारासाठी एका खासगी रुग्णालयात व नंतर 4 वाजता उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तपासून त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हेडकॉन्स्टेबल संदीप गुजर करत आहेत.
































































