उशीर झाल्याने प्रवाशाला जहाजावर चढण्यास रोखले, त्यानंतर असे झाले की व्हिडीओ होतोय व्हायरल

ग्रीसमधील एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.  एका व्यक्तीला जहाजावर चढाय़ला उशीर झाला. जहाज कर्मचाऱ्यांनी त्याला रोखल्यावर दोघांमध्ये झटापट होते आणि त्यातच बोर्डिंग रॅम्प मागे घेण्यात आला आणि पुढे असे काही झाले की त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. क्रू मेंबर्सवर आता चहूबाजूने टीका होत आहे.

ही घटना ग्रीसची राजधानी अथेन्सजवळील पायरियस हार्बरमध्ये घडली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका व्यक्तीला ब्लू होरायझन जहाजाच्या दिशेने धावताना दिसत आहे. पण तोपर्यंत जहाज बंदर सोडण्याच्या तयारीत होती. मात्र जहाज अजूनही तिथेच असल्याने त्या व्यक्तीने जहाजावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे असलेल्या दोन क्रू मेंबर्सनी त्या माणसाला जहाजावर येण्यापासून रोखले. बोर्डिंग रॅम्प मागे घेतला आणि झटापटीत ती व्यक्ती पाण्यात पडते. बंदराच्या मध्यभागी पाणी. मात्र त्यावेळी त्या क्रू मेंबर्संनी त्याची मदतही केली नाही. सीसीटीव्ही फुटेजबरोबरच तिथल्या प्रवाशांनीही ही घटना मोबाईमध्ये कैद केली. जी व्हायरल होत आहे. कोस्ट गार्ड येईपर्यंत किती वेळ निघून गेला होता हे स्पष्ट नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे. त्यांनी त्या माणसाला पाण्यातून बाहेर काढले तोपर्यंत तो माणूस बेशुद्ध झाला होता आणि नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.

या प्रकरणी ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस म्हणाले की, कालची ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. माणुसकीला काळीमा फासणारी आहे. हा बेजबाबदारपणा आहे. अशा प्रकारचा देश घडवायचा नाही.. ग्रीसचे व्यापार सागरी मंत्री, मिल्टियाडिस वरविटसिओटिस यांनी सांगितले की, क्रूचे वर्तन हे ग्रीक खलाशांचा घोर अपमान आहे, असे स्पष्ट होते. त्या व्यक्तीने जहाजडाचे तिकीट काढले होते काही कारणाने त्याला उशीर झाला होता.