अनेकदा कामाच्या व्यापामुळे लोकांची झोप उडते, तर कधी कधी इतपं दमायला होतं की, अंथरुणावर पडल्या पडल्या कधी झोप लागते कळत नाही. अशा गाढ झोपेसाठीही पैसे मिळतात, असं कुणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. मात्र एक व्यक्ती असंच काहीसं करून पैसे कमावतो.
सुपर मेनस्ट्रीम नावाचा एक यूटय़ूबर आपल्या बिछान्याजवळ मायक्रोपह्न, कॅमेरा, लायटिंग आणि मॉनिटर चालू करून ठेवतो. त्याला बघण्यासाठी लाखो दर्शक या लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये सहभागी होतात. त्याला बघणारे फक्त व्हिडीओच पाहत नाहीत, तर पैसेदेखील डोनेट करतात. लाइव्ह स्ट्रीम संपल्यावर हा व्हिडीओ पोस्ट केला जातो. व्हिडीओ बघणारे लोक त्याला गाणी वाजवून, मेसेज पाठवून उठवण्याचा प्रयत्न करतात. आठवडय़ातून एकदा सहा तासांचा यूटय़ूब लाईव्ह करून तो दोन लाखांहून अधिक कमाई करतो. यूटय़ूबवर स्लीप स्ट्रीम हा प्रकार लोकप्रिय होत चालला आहे. असे 170हून अधिक व्हिडीओ यूटय़ूबवर आढळले आहेत,

























































