रस्त्याच्या कामासाठी भांडवल घेऊन एक कोटींचा गंडा

राष्ट्रीय महामार्गाचे काम मिळत असल्याचे सांगून प्रोजेक्ट पुर्ण करण्यासाठी मित्राकडून 1 कोटी रूपये घेउन बदल्यात जास्त मोबादला देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ही घटना जून 2017 ते जुलै 2021 कालावधीत हडपसरमध्ये घडली आहे. याप्रकरणी तिघांविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. जून 2017 मध्ये आरोपींनी फिर्यादी तरूणाला नागपूर हायवचे काम मिळाले असून प्रोजेक्टसाठी भांडवल कमी पडत असल्याचे सांगितले. त्यानंतर मित्राकडून 1 कोटी रूपये घेउन बदल्यात 32 टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखविले.

त्यानंतर पुन्हा आरोपींनी तरूणाला साईटवर अपघात झाल्याचे सांगत पुन्हा तरूणाकडून 15 लाख रूपये घेतले.त्याशिवाय मुंबईतील एका बँकेकडून कर्ज मंजूर झाल्याची खोटी कागदपत्रे दाखवून तरूणाचा विश्वासघात करून फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजू अडागळे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या