
आजवर उंट, हत्ती अशा विविध प्राण्यांच्या पाठीवर बसून माणसांनी प्रवास केल्याचे पाहिले आहे. परंतू सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होणाऱया एका व्हिडीओत एक धाडसी तरुण चक्क व्हेल माशाच्या पाठीवर बसून समुद्र सफारीचा आनंद लुटताना दिसत आहे.
बोटीतून प्रवास करत असताना हा तरुण बोटीजवळ आलेल्या व्हेल माशावर उडी मारून बसण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओत दिसत आहे. हा मासा तरुणाला ढकलून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतू हा धाडसी तरुण माशाचे कल्ले पकडून त्यावर नियंत्रण मिळवून समुद्राची सफर करताना दिसतोय. आजवर हजारो लोकांनी हा व्हिडिओ पहिला असून तरुणाच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तर माशाला त्रास दिल्याने ते हल्ला करतात. हा केवळ मूर्खपणा असल्याच्या प्रतिक्रिया देखील काहींनी दिल्या आहेत.
أحد رجال البحر في ينبع يسبح مع أسماك البهلوان pic.twitter.com/QnvX9r2KE2
— عبدالله العلوني (@alalwaniabdulla) August 16, 2020



























































