भारत पेट्रोलियमची डिलरशीप देण्याच्या अमिषाने 1 लाख रुपयांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
money_2000-notes_note

भारत पेट्रोलियमची डिलरशीप देण्याच्या अमिषाने मुंबई येथील एकाने 1 लाख 3 हजार 832 रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना लातूर येथे घडली. या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर फसवणूक प्रकरणी स्वामी संगमेश्वर शिवशंकर (रा. वलांडी ता. देवणी) यांनी देवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुधांशू हरिप्रकाश चतुर्वेदी एलपीजी विस्तारक ए.के.केंद्र चेंबूर, मुंबई याने फिर्यादीस तुम्हाला भारत पेट्रोलियमची गॅस एजन्सीची डिलरशीप देतो म्हणून फिर्यादीकडून 1 लाख 3 हजार 832 रुपये बँक खात्यामध्ये मागवून घेतले. फिर्यादीने रक्कम जमा केली परंतु त्यांना डिलरशीप काही मिळाली नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी देवणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. आरोपी सुधांशू चतुर्वेदी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक काथवटे हे करीत आहेत.