सासर्‍याचे सुनेसोबत अनैतिक संबंधांचा संशय, मुलाकडून वडिलांचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत एका तरुणाने आपल्या वडिलांचा खून केला आहे. बायकोचे आणि वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय या तरुणाला होता, म्हणून त्याने आपल्या वडिलांचाच खून केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत अवधेश नावाचा तरुण आपल्या वडिल, भाऊ आणि बायकोसोबत राहत होता. मजुरी करून अवदेश घर चालवत होता. लॉकडाऊनमध्ये अवदेश बेरोजगार झाला होता आणि तो घरीच होता. आपल्या बायकोचे आणि वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यावरून पिता पुत्रांमध्ये जोरदार भांडणेही होत होते. म्हणून अवदेशने आपल्या बायकोला गावी पाठवले होते.

रविवारी अवदेश आणि त्याचे वडील दोघेच घरी होते.  अवदेशचा भाऊ बाहेर गेला होता. तेव्हा दोघांमध्ये पुन्हा भांडणे झाली. अवदेशने वडिलांना खूप मारहाण केली त्यात ते जखमी झाले, नंतर अवदेशने ओढणीने वडिलांचा गळा दाबून खून केला आणि घरातून पोबारा केला.

अवदेशचा छोटा भाऊ घरी आला तेव्हा त्याला आपले वडील बेशुद्धवस्थेत आढळले. त्याने तातडीने पोलिसांना बोलवले. वडिलांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी तपास केला असता अवदेशचा ठावठिकाणा आढळला. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक केली. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.