विवाहित पुरुषाचे तीन महिलांसोबत होते प्रेमसंबंध, संतापलेल्या गर्लफ्रेंडने 50 वार करून संपवलं

प्रातिनिधिक फोटो

तीन महिलांशी प्रेमसंबंध जोडलेल्या एका माणसाची त्याच्याच प्रेयसीने निर्घृण हत्या केल्याचं वृत्त आहे. आरोपी महिलेने आपल्या प्रियकरावर 50 वार करून त्याला जिवे मारलं.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना इंग्लंडमध्ये घडली असून गॅरी विल्यम्स असं या 58 वर्षांच्या माणसाचं नाव आहे. गॅरी हा विवाहित होता. तरीही त्याने अन्य दोन महिलांशी प्रेमसंबंध ठेवले होते. या तिन्ही महिलांना गॅरीच्या अन्य नात्याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. यातील एक प्रेयसी शेरिडन हिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी गेल्या वर्षी ख्रिसमसमध्ये आपल्या बायकोशी गॅरी खोटं बोलला. एका बिझनेस ट्रिपला जायचं आहे अशी थाप मारून तो शेरिडनसोबत दक्षिण वेल्थ भागात जाऊन राहिला.

ख्रिसमस दरम्यान त्याचं शेरिडनसोबत भांडण झालं आणि तिने त्याच्यावर चाकूने 50 वार केले. विल्यम्स रक्तबंबाळ अवस्थेत जागीच गतप्राण झाला. आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाल्याने शेरिडननेही आत्महत्या केली. या प्रकरणानंतर एकाच घरात या दोघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. त्यावेळी त्यांना या प्रकरणात आरोपी कोण असावा, याचा शोध लागला नव्हता. इतक्या महिन्यांनी त्यांनी सर्व साक्षी पुरावे तपासून हा निष्कर्ष काढला की, शेरिडन हिनेच रागाच्या भरात विल्यम्सला संपवलं आणि नंतर आत्महत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या