मैत्रिणीवर बलात्कार करून शाळेच्या ग्रुपवर व्हायरल केले अश्लील व्हिडिओ, विकृताला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळेतील मैत्रिणीच्या कौटुंबिक असाहयतेचा फायदा घेउन तिच्यासोबत जवळीक निर्माण करून एका विकृताने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर त्याने अश्लील व्हिडिओ शाळेच्या ग्रुपवर व्हायरल केले.

याप्रकरणी उमेश असुलाल डांगी ( 41 रा.शिल्पतारा सोसायटी, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पीडित महिला आणि आरोपी उमेश डांगी यांनी एकाच शाळेत शिक्षण घेतले आहेत. शाळेच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात त्यांची पुन्हा ओळख झाली होती. त्यानंतर संबंधितांनी व्हॉटसअप ग्रुप तयार केला होता. आरोपी उमेशने तरूणीच्या कौटुंबिक असहाय्यतेचा फायदा घेउन जवळीक वाढविली.

त्यानंतर त्याने तरूणी असलेल्या ठिकाणी जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. संबंधाचे व्हिडीओ रेकॉर्डीग करुन ते शाळेच्या गु्रपवर व्हायरल केले. त्यामुळे पीडितेच्या मित्र परिवारात मोठी बदनामी झाली.

या प्रकरणी पीडितेने तक्रार दिल्यानंतर 25 जूनला सहकानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला 24 तासात अटक करण्यात आली.