उल्टा-पुल्टा! तरुणाच्या लिंगातून विष्ठा आणि गुदद्वारातून वीर्य निघायला लागले; तपासणारे डॉक्टरही चक्रावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैद्यकीय इतिहासातील एक भलतीच विचित्र घटना डॉक्टरांना पाहायला मिळाली आहे. अमेरिकेतील टेक्सास भागातील रुग्णालयात 33 वर्षांचा एक माणूस सुजलेल्या वृषणाची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे आला होता. आपल्याला भयंकर त्रास होत असल्याचं या तरुणाने डॉक्टरांना सांगितलं होतं. हा तरुण मूत्रविसर्जन करत असताना गॅस सोडत होता आणि याच मार्गे विष्ठाही बाहेर पडत होती. याला वैद्यकीय भाषेत न्यमॅच्युरिया असं म्हणतात. विष्ठेऐवजी या तरुणाच्या गुदद्वारातून वीर्य आणि मूत्र बाहेर पडत होतं. याला वैद्यकीय भाषेत फेकालुरिया असं म्हणतात. या विचित्र आणि गुंतागुंतीच्या प्रकरणाबद्दल वैद्यकीय नियतकालीक आयएफएल सायन्समध्ये लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. या तरुणावर उपचार करण्यात आले असून त्याबद्दलची सविस्तर माहिती सेरेयस नावाच्या वैद्यकीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या तरुणामध्ये ज्या गोष्टी लिंगातून बाहेर पडणं अपेक्षित होतं, त्या गोष्टी गुदद्वारातून बाहेर पडत होत्या आणि ज्या गोष्टी गुदद्वारातून बाहेर पडणं अपेक्षित होतं त्या लिंगावाटे बाहेर पडत होत्या. डॉक्टरांनी या विचित्र रुग्णाची बारकाईने तपासणी केली. तपासण्यानंतर डॉक्टरांना या रुग्णाला फिस्टुलाचा त्रास असल्याचं दिसलं होतं, सोबतच मूत्रविसर्जनाचा मार्ग आणि विष्ठाविसर्जनाचा मार्ग यामध्ये एक मार्ग तयार झाला होता. याच मार्गाने शरीरातील घाण बाहेर फेकणाऱ्या मार्गाच्या सगळ्या दिशा बदलल्या होत्या. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून या तरुणाला होणारा त्रास दूर केला. 2वर्ष या तरुणाने हा त्रास सहन केला होता.

डॉक्टरांनी तरुणाबाबत अधिक माहिती गोळा केली तेव्हा त्यांना कळालं की 2 वर्षांपूर्वी अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे या तरुणाची अवस्था बिकट झाली होती. 3 आठवडे हा तरुण कोमामध्ये होता, ज्यामुळे त्याला कॅथेटर लावण्यात आले होते. कॅथेटर लावत असतानाच ही सगळी गडबड झाली असावी असा डॉक्टरांना दाट संशय आहे. या रुग्णावर टेक्सास वैद्यकीय विद्यापीठातील फ्रँक व्हेंच्युरा यांच्या देखरेखीखालील डॉक्टरांच्या पथकाने उपचार केले आहेत.