
अभिनेत्री सारा अली खान हिची सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच हवा आहे. सारा ही स्टार किड असली तरी तिचा साधेपणा चाहत्यांना कायम आकर्षित करत आला आहे. ती बऱ्याचदा चाहत्यांसोबत सेल्फी काढताना दिसत असते. मात्र बुधवारी तिला सेल्फी काढताना एक विचित्र अनुभव आला. एका चाहत्याने चक्क साराच्या हातावर किस करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने काही काळ साराही थबकली होती.
बुधवारी नेहमीप्रमाणे सारा तिच्या जिममधून बाहेर पडत असताना काही चाहत्यांनी तिच्याकडे सेल्फीची मागणी केली. तिने देखील त्यांची मागणी मान्य केली. चाहत्यांसोबत सेल्फी घेत असताना एका चाहत्याने तिच्यासोबत हात मिळविण्यासाठी हात पुढे केला. साराने देखील हात पुढे केला असता त्याने तिच्या हातावर किस करायचा प्रयत्न केला. सुदैवाने साराच्या बॉडिगार्डने वेळीच त्या माणसाला दूर लोटले. या अनपेक्षित प्रकाराने साराही आश्चर्यचकित झाली होती.

























































