Man vs Wild: 69 व्या वर्षीही थलायवा सुपरहिरो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मॅन वर्सेस वाइल्ड या शोमध्ये प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांचा सहभाग असलेल्या भागाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी या भागाचा एक टिझर प्रदर्शित झाल्यावर सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा झाली. आता या भागाचा दुसरा टिझरही प्रदर्शित झाला असून त्याचीही चर्चा सुरू आहे. 69 व्या वर्षांतही रजनीकांतची स्टाइल, लुक्स, उत्साह आणि एनर्जी बघून चाहत्यांची या भागाची उत्कंठा आणखी वाढली आहे. या टिझरमध्ये थलायवा रजनीकांत बेअर ग्रिल्ससोबत जंगलात मुक्तपणे वावरत आहेत. तसेच बेधडक स्टंट करतानाही दिसत आहेत. या वयातही त्यांचा उत्साह बघून बेअर ग्रिल्सनेही थलायवा यांना सुपरहिरो म्हटले आहे. या टिझरमध्ये रजनीकांत यांची गॉगल घालण्याच्या स्टाइलची चर्चा होत आहे. हा भाग 23 मार्चला रात्री 8 वाजता डिस्कवरी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

या भागाच्या चित्रीकरणावेळी रजनीकांत खूप पॉझिटिव्ह होते. या वयातही त्यांचा उत्साह आणि स्पिरीट वाखाणण्याजोगे आहे. या भागात त्यांच्यासमोर आलेल्या प्रत्येक आव्हानाला ते हिंमतीने आणि धैर्याने सामोरे गेले. 69 व्या वर्षातही त्यांच्यातील उर्जा प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. या वयातही ते सुपरहिरो आहेत. त्यांच्या सन्मान करण्यासाठीच हा विशेष भाग बनवण्यात आला आहे, असे बेअर ग्रिल्स यांनी सांगितले. या टिझरला आतापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आणि 16 हजारापेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. या टिझरमध्ये रजनीकांत यांच्या गॉगल घालण्याच्या स्टाइलचीही चर्चा सुरू आहे.